STORYMIRROR

manisha khamkar

Inspirational

4  

manisha khamkar

Inspirational

विचारांची नाळ

विचारांची नाळ

1 min
200

मनात पेटला जरी हिंसेचा वणवा

माणुसकीला असा जाळू नको मानवा

होरपळतील यात अनेक ललना

पश्चात्तापात आयुष्यभर जळशील मानवा


ज्वालांचे फुटतील अंतरी उमाळे 

भोग तुझ्या जन्माचा कधी न सरे

फेडावे लागेल कर्म तुजला याच भूवरी

तुझ्या अंतरीची कायम सुरात वाजव बासरी


विचारांची नाळ तुझी सत् मार्गावर चालू दे

सूड भावना मनातील विसरून जाऊ दे

हा देह नसे कुणाच्या अत्याचाराचा धनी

परोपकारी भावना असू द्यावी मनी


उलघाल तुझ्या मनाची होऊ दे कमी

संत संगतीने परिवर्तन होईल तुझ्या मनी

करून विचार नेटका अहंकाराला दूर फेका

सोड तुझा पुरुषी हेका माणूस म्हणून जगायला शिका


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational