STORYMIRROR

manisha khamkar

Others

3  

manisha khamkar

Others

रंग कोणता...?

रंग कोणता...?

1 min
358

लाल लाल मिरची सारखी

धारदार अन बाकदार चोच

तजेलदार पानांसारखी काया

पेरुची फोड , डाळिंब देतो खाया

सोन्याच्या पिंजर्यात केले बंदी

विसरलास तुझे जीवन स्वच्छंदी

मिठू मिठू बोलून गातो गोडवे

जीवनाचे तुला न कोडे सोडवे

किती सहनशीलता असे अंगी

कळे न मजला रंगला कुठल्या रंगी...?

कुहू कुहू गाणे गाते 

वसंताच्या रंगात न्हाते

गर्द हिरव्या आंब्याच्या वनी

तान छेडिते वसंत आगमनी

अंडी घालिते कावळीच्या घरी

कावळी पिलांना आपले म्हणून तारी

मातृत्वाचा असे आगळा रंग

सांग असा कसा वेगळा रंग...??

थुईथुई नाचतो पिसारा फुलवून

निसर्ग कसा टाकतो खुलवून

आकाशी जमतात काळे काळे ढग

पावसाच्या आगमनाची वाट बघ

केकराव करतो रानावनात

खुलते सृष्टी वर्षा आगमनात

मोरपिसाचे सुंदर मोहक रंग

सांग तुला कुणी दिले हे सौंदर्य...???

कधी झाडावर,कधी घरावर

कधी स्मशानात,कधी कचर्यावर

चालू असते तुझे कावकाव

स्वच्छतेचा होऊनी दूत

पित्तरांचा होऊनी दास

पितृपंधरवड्यात पोहचवी घास

डोंबकावळा म्हणती जन

कसे फेडिती तुझे ऋण

जन्मभर सेवेचा घेऊनी वसा

सांग तुझा हा रंग कसा...????


Rate this content
Log in