STORYMIRROR

manisha khamkar

Others

4  

manisha khamkar

Others

होरपळ

होरपळ

1 min
320

आज मनी पेटला माझ्या वणवा

होरपळून निघाल्या साऱ्या भावना

पुन्हा तीच बातमी नव्याने कानी

पुन्हा स्रीपणाची झाली मानहानी


काल होती डाॅक्टर प्रियांका

आज होरपळली प्राध्यापक अंकिता

उद्या आणखी नंबर कोणाचा येईल

भाकीत कुणास कसे करता येईल


स्री-पुरूष समानतेचा वाजवतो डंका

त्यापेक्षा बरी होती रावणाची लंका

भर चौकात मुली पडतात बळी

पुरुषी अहंकार तो साऱ्यांना छळी


लांडग्यांच्या अमानुष अत्याचाराला

पुरूषातील अशा सैतानी वृत्तीला

आळा कोण? कसे? कधी? घालणार

की नारी अशीच आगीत होरपळणार


उठ नारी खूप झाली पुरूषी गद्दारी

हातात घे ढाली आणि तलवारी

जो जाईल उगाच तुझ्या वाटेला

चंडीचे रुप धारण करुन उभा चीर त्याला


तुझी म्यानातली तलवार उसळू दे 

अंगात तुझ्या हत्तीचे बळ संचारू दे

हातात बांगड्या नको तर घे बंदूक

करून चार घाव दाव त्यास संदूक


Rate this content
Log in