STORYMIRROR

manisha khamkar

Others

4  

manisha khamkar

Others

शौर्य-साहस

शौर्य-साहस

1 min
435

आम्ही आदिवासी किती साहसी

डोंगरदर्यामध्ये राहतो वनवासी

खातो चटणी भाकर कंदमुळे

नाही भिती आम्हा मुळी कशाची

आम्ही डोंगरचे राजे आदिवासी (१)


करूनी काम अन् गाळूनी घाम

शौर्य भिनले आमच्या हाडामासी

आम्ही रानीवनी फिरतो अनवाणी

 रूतेना काटा आमच्या पायासी

आम्ही डोंगरचे राजे आदिवासी (२)


आम्ही दोस्ती केली इथल्या प्राण्यांशी

हिरवीगार झाडे अन् लता वेलींशी

आमची आई वरसूबाई डोंगरची

पाठराखीण असे ती आम्हा लेकरांची

आम्ही डोंगरचे राजे आदिवासी (३)


हातात भाला कमरेला तलवार

घेऊन फिरतो रानीवनी शिकारीशी

फिरतो स्वच्छंदी मानत नाही पाबंदी

वनकायदा करून केले आम्हा जायबंदी

आम्ही डोंगरचे राजे आदिवासी (४)


Rate this content
Log in