STORYMIRROR

manisha khamkar

Others

4  

manisha khamkar

Others

गडकिल्ले

गडकिल्ले

1 min
323

   गड किल्ले

अवघड गड तो सर कराया

घातला कुणी याचा भक्कम पाया

जगी महान असे कलाकार तो

निर्मिले पत्थरांना शत्रूचे घाव झेलाया


पाहिले या गडाने वैभव महाराष्ट्राचे

उंच गगनी मुक्त झळकणे भगव्याचे

वाजली गडावर या सनई आनंदाची

अनुभवली तंत्रे आदर्श राज्यकर्त्याची


झिजवली काया पाषाणांनी

घोड्यांच्या उधळलेल्या टापांनी

खणखणल्या इथे तलवारी

खोलवर घाव केले भाल्यांनी


झेलून शत्रूचे असंख्य वार

शूर वीरांचे सांडिले रक्त

 शत्रूला गप्पगार करूनी

झाले पावन गडाचे तख्त


इथल्या तटातटांनी पाहिली

देशभक्ती शिवरायांची

माती इथली सुगंध देती

सवंगड्यांच्या स्वामीनिष्ठेची


गडकिल्याच्या पाषाणाला फुटली वाचा आता 

निर्जिव मुकेपण सरले सजीव झालो आता

वास्तव्य लाभले या धरणीला महाराजांचे

तुडविलो आम्ही पण सोने झाले आम्हा पत्थरांचे


Rate this content
Log in