STORYMIRROR

manisha khamkar

Others

4  

manisha khamkar

Others

आईच्या छायेत

आईच्या छायेत

1 min
279


वटवृक्षासम धरते छाया

फुलासारखी कोमल काया

सुगंधित आम्हा केले

धरुनी संस्कारांची छाया


किती मिळतो गारवा

आई तुझ्या छायेत

निस्वार्थी निर्मळ भाव

आई तुझ्या मायेत


रुतू नये पायी काटा

बोजा खांद्यावरी वाहते

आई अनवाणी पायाने

सार्या रानातून चालते


आई तुझ्या कुशीत

जीवाला वाटतो ग आधार

तुझी कुस कशी ग उबदार

कसे ?,किती?मानू तुझे आभार


आई तू पाण्याचा निर्मळ झरा

प्रेमाचा साठा तुझ्या उदरा

आई तू मायेचा अथांग सागर 

भरली या मायेने ह्रदयाची घागर



Rate this content
Log in