STORYMIRROR

manisha khamkar

Others

4  

manisha khamkar

Others

होळी

होळी

1 min
450

आली रे, आली रे, आली होळी

जंगलात घुसली माणसांची टोळी

करून साऱ्या वृक्षांच्या कत्तली

बांधून आणली लाकडांची मोळी(१)


ओले-सुके असे काही न दिसले

जो तो बळ अाजमावत बसले

घालून कुऱ्हाडी कोयत्याचे घाव

विचार करण्यास नव्हता वाव(२)


पूर्वी जंगलझाडी होती खूप

आता पालटले निसर्गाचे रुप

आता जंगलं तोडून चालंल कसं

गळ्यात पडलं दुष्काळाचं फासं(३)


नव्या रुपानं साजरी करा होळी

गोड नैवेद्य करा पुरणाची पोळी

शेणाच्या गोवऱ्या, पालापाचोळा

जुन्या रिती-भाती तम गुण जाळा(४)


जंगलझाडी आहे संपत्ती आपली

किती पिढ्यानपिढ्या आपण जपली

वृक्षसंवर्धनाने वाढवू वसुंधरेची शान

वृक्षांकडून मिळेल प्राणवायूचे दान(५)


होळी पौर्णिमेला करा एक संकल्प

वृक्षलागवडीसाठी हाती घ्या प्रकल्प

प्रत्येकाने झाडे लावू, झाडे जगवू

पर्यावरण संवर्धन करून बदल घडवू(६)


Rate this content
Log in