STORYMIRROR

manisha khamkar

Tragedy Others

3  

manisha khamkar

Tragedy Others

आसरा

आसरा

1 min
276

पुलाखाली, झाडाखाली

पडक्या घराच्या जागेत

आसरा घेतात बेघर लोक

माळरानावर ठोकून पालं

जीवन मजेत कसे जगतात

या देशातील बेघर लोक

सरकारी योजना येतात

बेघरांना मिळेल घरकूल

कागदावरच त्या राहतात

नसते त्यात कोणाची चूक

अज्ञान ,निरक्षरतेचे जाळे गुंफलेले

पोटाची भूक भागवण्यास

रस्त्यावर सारे उतरलेले

फूटपाथवर, बसस्थानकात

आसरा शोधतात बेघर लोक

रातच्याला क्षणभर विश्रांतीची

जागा शोधतात बेघर लोक

पाठीवर रोज बांधून बिर्हाड

मुक्काम हलवतात गावोगावी

हक्काचा आसरा नसे त्यांच्या नावी

संविधानाने दिलाय हक्क समान

अन्न ,वस्र निवारा गरजा समान

इमले ,महाल, बांधिले धनिकांनी

गरीबांना आसरा नसे साधी झोपडी 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy