वि.दा.सावरकर...!
वि.दा.सावरकर...!
विनायकाची द्रष्ठी छबी
गवसणी घालू पहात होती
मुक्त स्वातंत्र्याच्या उंच नभी
अथांग सागराच्या
रौद्र आव्हानाला सामोरे
जाण्या ठणकावून स्तब्ध उभी
शरण येणे रक्तात नसणे
यालाच समजे जीवन असणे
त्या पुत्राचे स्वातंत्र्यास्तव होते जगणे
म्हणुनी नतमस्तक होणे
त्या उदात्त विभूती पुढे
हेच कृतकृत्याचे खरे इथे भाग्य मिळे
ज्यांच्या पवित्र वास्तव्याने
वास्तू इथली पावन झाली
त्या वास्तूवंदनाने दैन्य जीवाचे दूर पळे
विनायक दामोदर सावरकर
या नावाचे वादळ भयंकर हिंदुत्वाचे
म्हणजे काय अजूनही इंग्रजास त्या नित्य कळे...!!
