व्हॉट्सॲप
व्हॉट्सॲप
पोतं भरून जमा केल्येत व्हॉट्सॲप नाती,
खरं दुःख सांगायला पण तुरळकच हाती.
कोणी टाकली पोस्ट की
लाईक करण्याचं कंपल्शन,
वरवरच्या भावना नी व्हर्चुअल इमोशन्स.
जिथे पाहिजे तिथे असतंच माणसांचं प्रयोजन,
श्वास जड झाल्यास चालेल का चित्रातला ऑक्सिजन?
माणूस गेल्यावर न्यायला लागतात खरे खांदे चार,
काय उपयोगी दुःखी इमोजींचा तिथे भडीमार!
