STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

वहिवाट

वहिवाट

1 min
207

अथक श्रमूनी दमताचि

घरट्यात दोघे विसावली

बळ ना उरे तनमनाचे

पाखरे दिगंतरी उडली


कवडी कडी एक करुनी

जमविले धन संपत्तीते

स्वेच्छेने करुनी वाटणी

नजर उभयांची भेटीते


अपघात घडता दुर्दैवी

गतप्राण जाहले दोघेही

ओळख देख तया न कोणी

त्रयस्थच देई त्यांना अग्नि


फोनाफोनी होताच हजर

येती धावुनिया त्वरे दोघे

संपवुनी टाकली वाटणी

कुणाला काय हो त्याचे


वहिवाट ही असे जगाची 

इथे कुणाचे नच अडते

आला गेला चक्र निरंतर

बेफिकीर जग हे असते



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract