STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Inspirational

2  

Abasaheb Mhaske

Inspirational

व्हायरस...

व्हायरस...

1 min
2.7K


पाश्चात्यांचा  संस्कृतीचा  व्हायरस आला

प्रेम, जिव्हाळा काही न उरले.

पैशांसाठी अनिवार धाव धावं धावणं

त्यासाठी वाट्टेल ती तडजोड करणे. 

नकोसे प्रोग्राम्स  डीलीट करुन  सात्विक विचार इन्स्टाॅल     करा

इवलंस बाळ पाळणाघरात,आजी-आजोबा वृद्धाश्रमात

कोण केंव्हा येतो घरी लागेना थांगपत्ता.

कोणाचंही न ऐकता आपलंच घोडं दामटवंण

पाहीजे असते त्यांना पैसा अनं सत्ता.

नकोसे प्रोग्राम्स  डीलीट करुन  सात्विक विचार इन्स्टाॅल   करा

तंग जिन्स झिरमाळ्या शर्ट फॅशनच्या नावानं चांगभलं

हॅँग झालाय त्यांच मेंदू अनं मन झालीयत बधीर

अभ्यासाच्या नावानं बोंबाबोंब,व्यसने करून बिनधास्त जगणं

शिक्षणपध्द्ती, सिस्टमच्या विरोधात तावातावानं बोलण

नकोसे प्रोग्राम्स  डीलीट करुन  सात्विक विचार इन्स्टांल     करा

सुसाट वेगानं बाईक,  कानाला सतत हेड्फोन

ना मित्र ना कसला मैदानी खेळ तासंनतास फेसबुक , गुगल

बुरसट्लेत विचार पाश्चात्यांच्या अंध अनुकरणाने

नकोसे प्रोग्राम्स  डीलीट करुया पुन्हा

 नव्याने उज्वल,  सात्विक विचार इन्स्टाॅल करा

 

 

 

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational