वेळ बदलली..
वेळ बदलली..


वेळ बदलली की माणसे ही बदलतात
आपलेच लोक नाती-गोती विसरतात
सुखाचे सोबती सारे दुःखात पळ काढतात
क्षण भरल्या आयुष्यात हेवेदावे करून रस्सीखेच चालवतात
वेळ बदलली की दृष्टिकोन ही बदलतात
लोक स्वतःच्या मनासारखी हवे तसे वागतात
ज्यांची असायची गरज तीही
मग त्यांना लगेच खटकतात
वेळ बदलली माणस सार काही विसरतात
स्वतःच्या स्वार्थापुढे, ज्यांनी मदत केली
त्यांनाच दुर्लक्षित करतात
वेळ बदलली की बदलतात संवेदना,
बदलतात भावना नात्यातील अंतर
मग आपोआप वाढतात गैरसमजाच्या नावाखाल
ी
जीवनाची सारी समीकरणे बदलतात
वेळ बदलली की 'हा आपला तो आपला,
हे भ्रम वेळवर नाहीसे होतात कालपर्यंत
आपली वाटणारी माणस
क्षणात परकी होतात
वेळ बदलली की एकमेकांशी असलेले संवाद बंद होतात
प्रत्येकाची वेळ नक्की येते हे मात्र काहीजण विसरतात
निस्वार्थपणाची जागा स्वार्थपणाने घेतली की
खऱ्या प्रेमाची, आपुलकीची माणसे ही दूर निघून जातात
वेळ बदलली, बदलत्या जगाचे वाहतात सारे वारे
क्षणाचा इथे भरोसा ना राहिला आता म्हणूनच
आनंदाने जगा, रुसवा-फुगवा नका बाळगू आता रे.