वेळ अभंग रचना
वेळ अभंग रचना
वेळेचे महंत्व ।। जाणावे सर्वांनी
खरी गोष्ट ध्यानी।। धरावीच
छंद ही असता।काढावी सवड
जडेल आवड।।जीवनात
वेळीच सावध ।।असावे सकल
होईल उकल ।। संकटाची
वेळ व्यर्थ वाया ।। कधी घालू नये
व्यर्थ जाऊ नये।। संधी छान
उद्योगी असावे।। नित्य नियमाने
प्रामाणिक पणे।। काम करू
संधीचे हो सोने।। करावे जीवनी
उत्तम करणी ।। करावी हो
वेळ कोणासाठी ।। नाही हो थांबत
वेळेशी संगत ।। धरावीच
धरू नये कधी ।। मनी अहंभाव
पडेल हो घाव ।। जीवनात
वेळ हाच गुरू ।। शिकवी सर्वांना
मंगल कामना ।। करावी हो
वाईट समय।। येता जीवनात
खंबीर मनात ।। राहावेच
