STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational

2  

Pandit Warade

Inspirational

वेध

वेध

1 min
14K


 

कधी कुणाला कळला नाही खेळ प्रारब्धाचा

ऊन पावसा परी चालतो खेळ आयुष्याचा


प्रारब्ध म्हणजे पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ

त्याप्रमाणे नित्य चाले जीवनाची वळवळ


सुख दुःखाचे येणे जाणे जीवन त्याचे नांव

माहित नाही आज कोठे उद्या कोणता गांव


सोडा विचार भूतकाळाचा, भविष्याची चिंता

जगा आनंदे वर्तमान, व्यर्थ कशाला गुंता


पूर्वजन्मीच्या कर्माने प्रारब्ध बनते जरी

निरोप घेता या जन्माचा, घ्या सोबत शिदोरी


प्रारब्धाच्या नांवे रडणे बंद करू हो आता 

स्वतःच्या कर्माने प्रारब्धास बदलवू आता


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational