वाटले नव्हते कधीचं
वाटले नव्हते कधीचं


कोरोना आला कोरोना
जगात दहशत पसरली
कोटी लोकांना लागण होऊन
लाखो लोक मरण पावली
वाटले नव्हते कधीचं
असे दिवस येतील
प्रगतीच्या दिशेने जाताना
माघारी घेऊन जातील
हातावर पोट असणा-या
रोजगारांचे काम थांबले
अनेकांच्या नौक-या गेल्या
सर्वकाही ठप्प झाले
मानव , समाज , राष्ट्र
सर्वांची अडवणूक झाली
एका न दिसणा-या विषाणूने
महाभयंकर आपत्ती आणली
कमावले होते थोडेसे
घरात बसून खाण्यात गेले
खिशे झाले रिकामे
घरात काहीचं नाही उरले
स्वप्न पाहिले अनेक
स्वप्नावर पाणी पडले
होते नव्हते तेे सारे
आता संपून गेले
माणसे झाली कासावीस
जीव झाला नकोसा
कोरोना जाईल म्हणून
धीर धरती थोडासा ...