STORYMIRROR

Pandit Warade

Classics

4  

Pandit Warade

Classics

वाट वळणाची

वाट वळणाची

1 min
690

अशी वाट वळणाची

कडे  कपारी  मधून

नागमोडी  वळणांनी

जाते दऱ्या खोऱ्यातून


आड रानातून जाते

काटे  कुटे  पचवते

असो कुणी वाटसरू

योग्य स्थळी पोचवते


वाट जीवनाची सुद्धा

अशी आहे अवघड

मृत्यू  येईतो चालते

जगण्याची  धडपड


येवो  कितीही  संकटे

नाही  जायचे  खचून

पार करा ज्याची त्याने

वाट   कंबर  कसून


नको थांबू क्षणभर

पुढे पुढेच जायचे

वाट सांगते मनाला

कणखर  बनायचे



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics