STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Inspirational

3  

Neha Ranalkar(Nawate)

Inspirational

वारी भक्तांची

वारी भक्तांची

1 min
431

डोक्यावर मुंडासे ठेवून

विठ्ठल मूर्ती घेऊन मनोहर |

वारीत हासतमुखे निघे ललना

भक्तीरसात भिजून खरोखर | |१| |


पंढरीचा सावळा तिचा विठू

निघाली दर्शनासाठी हर्षभरे |

संसारात सारे सुखदुःख जरी

हरी तिचा कृपाळा मनी गर्व ठरे | |२| |


तहानभूक हरपून पायी निघाली

ओठांवर लाली चढली भक्तीची |

तिच्या विश्वासा भक्तीची किनार

नसे कल्पना तिज आत्मशक्तीची | |३| |


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational