वारा
वारा
🍃🍂🍁🍃
पहाटेच्या वेळी आणतो अंगावर शहारा
वाटतो आल्हादायक जेव्हा चढलेला असतो पारा☺️
पुष्प मोह गंधाळता अलवार येतो
चाहुलीने त्या स्पर्शाच्या फुलांना मोहर येवून🌼🌸
अल्लड अवखळ गंध कळ्यांचा
दूर दूर नेतो
इवल्या इवल्या फुलपाखराला ही
मकरकंदाचा मोह तुझ्या मुळे अनावर होतो
वळीवात कधी कधी होऊन येतो गारा
फुलाफुलांच्या झाडांमधून उधळीत गंध सारा 🌺🌸🌹
कधी हळूवार झुळूक बनून अवचित बिलगून जातो
कोणताही भेदभाव न करता सर्वांना अलगद स्पर्शून
गूज मनीचे कधी कधी सांगून जातो😊
ना परवा ना तमा कशाची धुंदी
फक्त वाहण्याची
सुगंध घेऊन खांद्यावर परिसर मोहतो सारा
असा बेधुंद होऊन व्यापतो आसमंत सारा
तुझ्या वेगाला नाही बंध तू असा स्वच्छंद
रुद्र रूप घेता सर्वत्र करतो अंधाधुंध
ओढ लागता धरतीची पुन्हा
वाहतो मंद- बेधुंद 🤗
व्हावे वाटते कधीतरी तुझ्यागत
सोडून साऱ्या चिंता पाठी स्वैर फिरावे
निळ्या नभाशी पैज लावता
अलगद हळूवार उंच उंच उडावे 🤗
कधी वटवृक्षाच्या फांदीवर
मनसोक्त झुलावे
कडाडणाऱ्या मेघाला ही हलकेच कुशीत घ्यावे
होऊन मुक्तांगण भावनांचे अन जपावे
त्या नात्यांना बांधून रेशमी धागे सुखाचे
मन मोरपंखी व्हावे कधीकधी
व्हावे मुक्त पक्षी
हृदयी साठवून आठवणींनी शिंपण वाटे
साकारावी नात्यांची एक सुंदर नक्षी
असेल नसेल ते सगळे मुक्तपणे उधळावे
या दुनियेत वावरतांना स्वच्छंदी जगावे
बंध जुळता जुने पुराने गंध नवे पसरावे
🌸🌼🌺🌸🌼🌺
