STORYMIRROR

Sarika Jinturkar

Abstract Others

4  

Sarika Jinturkar

Abstract Others

वादविवाद

वादविवाद

1 min
384

निराळेच असतात या 

आयुष्याचे खेळ 

कधी अन् कसे कळत नाही जुळतात मेळ

 सगळ सुरळीत चालत राहत

 पुढच्या क्षणात काही

 बिघडल्या सारख वाटत


 आपल्याच माणसाला कळत नाही आपल्या भावना,

टाळले तरी वाद- विवाद होतात कस समजावे या मनाला


 करमत नाही आपली माणसे रूसल्यावर

घास तरी कसा गळ्यातून उतरणार

 त्यांची सोबत नसल्यावर 


आपुलकी, प्रेम म्हणजे व्यवहार नव्हे 

ती आहे सुंदर भावना 

का? तरी वेळ लागतो 

समजून घेण्यास काहींना 


वाद-विवाद होतच असतात

वेळ चुकली असली तरी 

निर्णय चुकवायचे नसतात 

नशिबाने मिळतात काही नाती

 ती सहज गमावयाची नसतात


राग आला कधी तोही असावा लटका

फार काळ टिकू नये असावा एखादा घटका

 वाद- विवाद होत असतात  

उगाच धरू नये त्यानंतर अबोला 

दोन क्षणांचा वाद असतो 

कित्येक अनुभव अविस्मरणीय आठवणी,क्षणांचा 

सहवास असतो हा लाभला..



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract