STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

वादळवारे

वादळवारे

1 min
192

सुटे वादळ सुसाट

कसा दर्या उसळला

काय करशील मानवा?

गर्व उद्दाम जिरला


घोर वादळ तडाखे

किती योजना करिसी

व्यर्थ तुझा अट्टाहास

श्रेष्ठ स्वतःला मानिसी


किती बाधित शापित

कसे स्वर्गलोकी गेले

ईश्वरेच्छा बलियसी

फक्त म्हणणे उरले


नियतीच्या हातातील

बाहुलेच कळसूत्री

राजा निसर्गाशी घ्यावी

जमवूनी तूच मैत्री 


नसे हातात तुझिया

जीवनाचे रे सुकाणू

जगन्नियंत्याच्या हाती

तोच सूत्रधार जणू


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract