STORYMIRROR

Shila Ambhure

Inspirational

3  

Shila Ambhure

Inspirational

वाचनगीत

वाचनगीत

1 min
28K


चिंटू पिंकी बंटी

या रे या सारे या

छान छान छोटी

पुस्तके वाचूया.।।धृ।।


आज आहे खास

वाचनाचा दिन

पुस्तकांसमोर

होऊया रे लीन

एक ना अनेक

गोष्टीही वाचूया।।1।।


निसर्ग जंगले

पक्षी नि प्राणी

गोष्टीत आहेत

राजा नि राणी

बिरबलाची त्या

हुशारी वाचूया।।2।।


वाचन करूनि

बनूया सज्जन

ज्ञानी आणि गुणी

बनूया आपण

दिसामाजी थोडे

वाचन करुया।।3।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational