STORYMIRROR

Sarika Jinturkar

Inspirational

3  

Sarika Jinturkar

Inspirational

वाचन

वाचन

1 min
243

लिहिणाऱ्याच्या हेतूनुसार वाचणाऱ्याच्या तयारीप्रमाणे

होणारे अर्थाचे आकलन म्हणजे वाचन  

भाषा साध्य करण्याचे, संवादाचे, माहिती 

कल्पना व्यक्त करण्याचे अन् आपल्या जीवनाला

उन्नत करण्यासाठी नेहमीच ठरते हे एक महत्त्वाचे साधन  


प्रत्येक व्यक्तीने वाचनाचा 

छंद जोपासला हवा  

वाचनामधूनच इतरांचाही

अनुभव मिळत असतो नवानवा  


वाचता वाचता मिळते सखोल ज्ञान

उंचावते जीवनमान 


कधीतरी स्वतःसाठी वेळ काढून

शब्दांच्या दुनियेत रमून बघावं  

तिथल्या अक्षरांशी गट्टी करावी 

सुंदर विचारांच्या बागेत फिरून यावं  


सुकलेली खराब झालेली तुमच्या

विचारांची पाने दूर सारून  

नव्या विचारांची कोवळी पालवी फूटू द्यावी 

आवडलं तर नक्कीच रमाल अन् 

"वाचाल तर वाचाल"  

अन् हाती घ्याल मग नव्या विश्वाची मशाल 

ज्ञानभांडार ही तुम्ही वाढवाल 

वाचन संस्कृतीचे जतन केले तर

जगण्याचे, निराशेचे भय ही तुम्ही दूर पळवाल  


अलौकिक हे ब्रम्हांड सुंदर, 

सुंदर अवघे जीवन करावे, नित्य नवीन वाचत जावे  

वाचता वाचता सखोल स्वतःला शोधत जावे

स्वतःच सुंदर पुस्तक कधीतरी होऊन बघावे


वाचन एक प्रवास सुंदर...

चला होऊ या शब्दांचे धनी

वाचुनी तल्लख होते बुद्धी 

लिखितांचे व्हावे सदैव ऋणी  

कथा, कविता, लेख, चारित्र जणू रूचकर ही मेजवानी

स्वार होऊनी शब्दांवरती वाचनाचा 

ध्यास वसावा प्रत्येकाच्या मनी 

 वाचतो जो निरंतर तोचि मानावा खरा ज्ञानी 

महान ते झाले हा मंत्र जपला ज्यानी


वाचन केल्यामुळेच घेता येईल

बुद्धीच्या पंखांना उडण्याची भरारी  

वाचलेले ज्ञान कृतीत उतरवल्याने होईल

आयुष्याच्या रस्त्यावर आत्मविश्वासानेे चालण्याची तयारी


म्हणूनच आपल्या दैनंदिन जीवनात 

वाचनाला देऊ या विशिष्ट आकार 

डॉ. कलाम सरांचे स्वप्न

होईल तेव्हा कुठेतरी मग साकार... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational