वाचाल तर वाचाल..!
वाचाल तर वाचाल..!
********************************
जीवनाचे सार!आपण *शोधावे*!
पुस्तक *वाचावे*!मनोमनी। !!१!!
शब्दांचा खजिना!पुस्तके *वाचता*!
आनंद *मिळता*!साहित्याचा। !!२!!
मिळे सदा ज्ञान!पुस्तकांची *थाप*!
अज्ञानाचे *शाप*!ज्ञानातुनी। !!३!!
ज्ञानाचे भांडार!घ्या *वाचनातून*!
सुंदर *जीवन*!आवडीने। !!४!!
कळावे मनाला!सार *पुस्तकांचे*!
भाव*विचारांचे*!आयुष्यात। !!५!!
वाचनाची गोडी!असावी *सर्वाना*!
हि *मनोकामना*! अंतरंगी। !!६!!
संचयाचा साठा!मिळे *ज्ञानातुनी*!
छंद हा *गोफुनी*! वाचनाचा। !!७!!
--------------------------------------
