उत्तुंग भरारी
उत्तुंग भरारी
साकार व्हावी सारी स्वप्ने,
पोचावे यशाच्या उत्तुंग शिखरी,
ध्येय,जिद्द अन् चिकाटीने,
घे आकाशी उंच भरारी.
जा पुढे पुढे मागे वळूनि पाहू नको,
ठेच लागता वाटेवरती, अडखळूनि थांबू नको.
काट्याकुट्यांचा रस्ता असला जरी खडतर,
हो ध्येयवेडा मग मार्ग होईल सुखकर.
अफाट आनंद आणि यश लाभो तुला,
फुलासारखे फुलत रहा,उमलत रहा सदा.
सुवासिक सुगंध तुझ्या आयुष्यात दरवळू दे,
शिवमय शुभेच्छा राहो पाठीशी,
उदंड आयुष्य लाभू दे.
