STORYMIRROR

Shital Kuber

Abstract

4  

Shital Kuber

Abstract

उत्तरे नवी शोधते मी...

उत्तरे नवी शोधते मी...

1 min
139

उत्तरे नवी शोधते मी

पण प्रश्न जुनेच आहेत....

आणि जुने प्रश्न मांडताना

मात्र शब्द नवे आहेत....


काळ जरी बदलला

तरी व्यथा त्याच आहेत....

व्यथा त्याच असल्या

तरी आवाज नवा आहे....


नवे सुर आळवताना

राग जुनाच आहे....

राग जुना वाटला

तरी ताल नवा आहे....


भ्रष्टाचाराचा विळखा सोडवताना

वाटते भ्रष्टाचार जुना आहे....

भ्रष्टाचार जुना असला

तरी करणारा वर्ग नवा आहे....


मला वाटायचं, घाम गाळणारा शेतकरीच साधा आहे

पण जेव्हा सुटाबुटातली माणसं म्हणतात....

की आम्ही फार साधे आहोत....

तेव्हा कळते....

हा साधेपणा नवा आहे!


अडचणींच्या चिखलात जेव्हा

पाय रुततो.... तेव्हा कळते

रस्ता जुना असला....

तरी चिखल नवा आहे....


म्हणूनच म्हणते....

उत्तरे नवी शोधते मी

पण प्रश्न जुनेच आहेत....

आणि जुने प्रश्न मांडताना

मात्र शब्द नवे आहेत....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract