उठी उठी गणराया
उठी उठी गणराया
उठी गणेशा , पहाट झाली
रश्मी किरणे , झळाळी आली //धृ //
नाद ओंकार , घुमला ध्वनी
नाद माधुर्ये , तुम्हां जागवी
उषा लाजरी , आरक्त झाली
रश्मी किरणे , झळाळी आली
रुप साजिरे , दिसे शोभूनी
तेज पसरे , दिव्य राऊळी
दिव्य नयने , प्रभा फाकली
रश्मी किरणे , झळाळी आली
मान नेहमी , अग्र पूजनी
विघ्न हरसी , सुख वर्षसी
मुख दर्शने , चिंता हरली
रश्मी किरणे , झळाळी आली
उठी गणेशा , पहाट झाली
रश्मी किरणे , झळाळी आली
