STORYMIRROR

Sujata Puri

Inspirational

3  

Sujata Puri

Inspirational

उपेक्षित

उपेक्षित

1 min
104

समतेची चार किरणे पडावीत अंगावर,हीच एक आस होती

उपेक्षितांच्या मनात.......

द्वेषाची पण भावना होती

स्वार्थी मनांच्या जनात.......


संविधानाच्या रुपानं बाबासाहेब तुम्ही समतेचा अवघा सूर्य आणला दारी.......

आता खरी दिवाळी झाली होती सुरू

उपेक्षितांच्या दारी आणि घरी......


पिढ्यान् पिढ्यांचा सुतक बाबासाहेब तुमच्यामुळे फिटलं......

उपेक्षित माणूस म्हणजे पशू नसतो हे समाजातलं मोठं कोडं सुटलं........


आता पुन्हा गरज आहे प्रज्ञा सूर्याच्या विचारांची.....

कारण आता गर्दी झाली आहे स्वार्थी आणि ढोंगी आचारांची..,..


नव्याने पुन्हा जागवू या

बाबासाहेबांचे विचार.....

समाजातील दुष्ट शक्तींचा

घेऊ योग्य समाचार.....


महामानवा तुला जे जमलं

ते आम्हालाही जमेल का......

दे तेथून आशीर्वाद आम्हाला

पण खरंच तुझं कार्य समजेल का.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational