...उणे शून्य....
...उणे शून्य....


चिंतन ,मनन, पठण
सगळेच करून झाले
तरीही उरताहेत निरुत्तरच
काही शब्द.......
का असे,का तसे
मेळ घालून सारे झाले
तरीही बाकी उरतेच
उणे शून्यच कसे.....
माझे ही नाही ,आणि तुझे ही नाही
यांचे त्यांचे करून झाले
तरीही उरते कोडे
अर्धवटच कसे......
निःशब्द मनाच्या पोकळीत
असेच प्रश्न अडकून पडलेत
तरीही कोण कसा तेच बुद्धीला ही
कळेनाच कसे.......
गहान पडलेय बुद्धी
मनाच्या चाकोऱ्यात
तिनेही हात टेकलेत आत्ता
समोर नियतीच्या...
चिंतन मनन पठण
सगळेच करून झाले