STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract Romance

3  

Manisha Wandhare

Abstract Romance

उन्हे चालती...

उन्हे चालती...

1 min
6

पाऊल पाऊल उन्हे चालती ,

रात्र ओसरून दिवस वाढती,

उबदार आता वारा आला ,

पंतग उडवूया चला ,

घेऊन मांजा सोबतीला ,

सण साजरा मकर संक्राती ...

उंच उडून पंतग गाणे गाती...

रंगीबेरंगी पतंग उडल्या ,

आकाशाला गिरक्या घाला,

वारा हसुन फेर धरते ,

गुंतून मांजा पतंग कटते ,

धावा धावा पकडा तिला,

उडली कुठे ,

विचारा क्षितीजाला ,

अशी रंगली ती ,

पाहून हसली दंगली ती ...

पाऊल पाऊल उन्हे चालती ,

रात्र ओसरून दिवस वाढती ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract