उन्हाळी सुट्टी
उन्हाळी सुट्टी
आला उन्हाळा नको ही शाळा
हवी आता सुट्टी
मित्रा सोबत मज्या करूया
जमेल आमची गट्टी ।। धृ ।।
नको अभ्यास नको पुस्तक
शांत ठेऊया आता मस्तक
घेऊ शाळेशी कट्टी ।।
लवकर उठणे शाळेत जाणे
चाले नित्याचे रड गाणे
मारु शाळेला बुट्टी ।।
गावी जाऊन पोहण्याची
सवय आमची नेहमीची
यात नाही केव्हा सुट्टी ।।
जमवून सारे रानात गडी
खेळ खेळतो आम्ही कबड्डी
डाव मारुन पक्कड मिठी ।।
डाव दुपारी आट्या पाट्या
सांज वेळी खेळून गोट्या
नेम धरून मारू गोटी ।।