STORYMIRROR

MAHENDRA SONEWANE

Action

3  

MAHENDRA SONEWANE

Action

उंच भरारी

उंच भरारी

1 min
12.6K

दूर गगनात मज उडायचे आहे

प्रकाशाचे जग मला जिंकायचे आहे


अनंत आकाशात हिंडून हिंडून

मला स्वच्छंद फिरायचे आहे


पाखरा पेक्षाही या डोळ्यांना

दूरवरचे दृश्य दाखवायचे आहे


अशी मी घेऊन भरारी

आकाशातील तारे तोडायचे आहे


आलाच कधी जीवनात अपयश

खचून न जाता उंच भरारी घ्यायची आहे


बंद झाल्या सर्व वाटा विषारी

उंच भरारी घेऊन आदर्श घ्यायचे आहे


चढ-उतार सुख दुःख जीवनात

यांचेशी समर्थपणे लढायचे आहे


नवीन काही शोधायचे आहे

दूर आकाशात मज उडायचे आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action