STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3.8  

Prashant Shinde

Inspirational

उंच भरारी...!

उंच भरारी...!

1 min
27.4K


उंच भरारी

आकाशी मी घेईन

संकल्प सिद्धी

जवळी माझ्या खेचीन


कष्टाला माझ्या

योग्य मान मी देईन

चीज श्रमाचे मी

स्वकर्तुत्वाने करीन


झाले गेले सारे

मी विसरून जाईन

नव्या वाटेवरती

नवे पाऊल मी टाकीन


यशा साठी

स्वतःस आता झोकून देईन

कवेत सारे विश्व

सामावून मी घेईन


असे जीवन मी

यापुढे आनंदाने जगीन

जाता जाता संकल्प पुर्तीचा

एक आदर्श जगा पुढे ठेवीन ....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational