STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

2  

Manisha Awekar

Abstract

उखाण्यांची मौज

उखाण्यांची मौज

1 min
104

(१)

मोबाईल माझा सखा , सारखा लागतो खिशात

कार्ड काढून ठेवल्यावर , हे सैरभैर झाले मनात

पाचशेची नोट द्या , मी थाटात फर्मावले

चिंतामणी नोट देऊन , चक्क माझ्यापुढे वाकले


(२)

पाडव्यादिवशी पत्नी , औक्षण करी पतीला

ओवाळणी देई पती , आपल्या प्रिय राणीला

ओवाळणीची डबी ,बघून आश्चर्यचकित 

अंगठी दिली मला , मस्त रत्नजडित

झाले मी आश्चर्यचकित , चिंतामणी आनंदित    


(३)

अस्सं सासर द्वाड म्हणतात ,

पण प्रेमळ माझं सासर

सासूसासरे नणंदा दीर

पतीप्रेमाला सदा बहर

असाच राहो बहर नित

फुललेला माझ्या घरात

चिंतामणराव माझ्या उरात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract