STORYMIRROR

Sarika Jinturkar

Abstract

3  

Sarika Jinturkar

Abstract

उगाच श्रीमंत झालो

उगाच श्रीमंत झालो

1 min
199

उगाच श्रीमंत झालो 

 श्रीमंतीच्या या नादात  

 माणुसकी ,आपुलकी जिव्हाळा 

आम्ही आहे विसरलो  


पूर्वी एका खोलीत सगळे सामावून जायचो

एकमेकांशी संवाद करीत

एकमेकांचा सुखद सहवास अनुभवत

साध सरळ सोप जीवन जगायचो 😊


टीव्ही मोबाइल नसायचे पण 

मनोरंजन खूप असायचे 

 शेजारी ही एकमेकांविषयी 

आपुलकी असायची 

नात्यात एक प्रकारची ओढ असायची

बिकट परिस्थिती असतानाही 

मनसोक्त जगण्याची हौस असायची


आता वाटतं उगाच श्रीमंत झालो..  

पूर्वीसारखी कुठे आता अंगत-पंगत

 पत्त्यांचे डाव ही आता नाही रंगत 

हरवली आहे आता नातीगोती 

आणि मैत्रीची संगत  


श्रीमंत,आधुनिक झालो आणि सगळं हरवत चाललो.....

 विभक्त कुटुंब पद्धती,

चार माणस असली तरी  

रूम मात्र प्रत्येकाची आहे वेगवेगळी  

पूर्वीसारखा जिव्हाळा व स्नेह नाही राहला 

दुखलं- सुकलं तर नाही ऐकू येत 

आर्त आर्ततेची  

काय उपयोग असल्या श्रीमंतीचा....? 

न जाणीव होत इथे माणूस आहे की गेल्याची..😔  

सुखाच्या शोधात जाणीव नाही राहिली आपलेपणाची ...


 आपण जगतो आहोत कशासाठी...

 शोधावे ते जग कुठे...

 म्हणूनच शांताबाई शेळके यांनी म्हटल्याप्रमाणे  


✨सहज फुलू द्यावे, सहज दरवळावा वास 

अधिक काही मिळवण्याचा

 करू नये अट्टाहास  

सुवास, पाकळ्या, पराग, देठ, फुल इतकीच देते ग्वाही  

अलग अलग करू जाता हाती 

काही उरत नाही

दोन पावलांपुरते जग तेच 

अखेर असते खरे 

हिरवीगार हिरवळ तीच 

त्यांच्यापुढे काय उरे ...? 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract