त्यांच्यामुळे मी बी घडलो
त्यांच्यामुळे मी बी घडलो
आयुष्यात खूप माणसं भेटली
काही मनाला भावली तर
कुणी विनाकारण खेटली
तर कुणी फारकत घेतली
आयुष्यात खूप माणसं भेटली
कुणी निर्मिले जिवाभावांचे नाते
तर कुणी अंगिकारले गनिमी कावे
कुणी मनात खोलवर घर केले
आयुष्यात खूप माणसं भेटली
कुणी दाखवले हात तर
कुणी मदतीचा हात पुढे केला
तर कुणी कायमच घात केला
आयुष्यात खूप माणसं भेटली
कुणी प्रेमळ ,कुणी संधीसाधू
कुणी अंधभक्त ,कुणी अज्ञानी
स्वाभिमानी तर कुणी पाताळयंत्री
आयुष्यात खूप माणसं भेटली
कुणी नाहक रस्त्यात पेरले काटे
तर कुणी विनाकारण हिणवले
कुणी आपुलकीने डोळे पाणावले
आयुष्यात खूप माणसं भेटली
त्यांचे सर्वांचे आभारच मानेन
कारण त्यांच्यामुळे मी बी घडलो
सत्यासाठी कायमच धडपडलो
