तू उंच उंच पर्वत
तू उंच उंच पर्वत
मी लहानसा तरु
सांग रे सख्या मी
तुला कशी स्मरू.
तू अनूभवाची खाण
वटवृक्षासारखा महान
मी तुझ्याहुनी लहान
सांग तुला कशी स्मरू.
तुमचे पवित्र ते तन
अमृतासम मन
गाती गाणी तुझे जन
सांग तुला कशी स्मरू.
मी बांधूनी पाठी शिदोरी
फिरते ज्ञानाच्या दरबारी
देते एकतेची ललकारी
सांग तुला कशी स्मरू.
