STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Tragedy Others

2  

Abasaheb Mhaske

Tragedy Others

तू फक्त वाच ...

तू फक्त वाच ...

1 min
13.8K


बळीराजा रगत ओकतो ...

तरीही मोल न त्याच्या घामाचं

इथून - तिथून चोर सारे 

एक नाही कामाचं ...

थापाड्याच्या शेतात बारा औतं 

बघायला गेलं तर एकही नव्हतं 

आंधळं दळतंय कुत्रं पीठ खातं 

कशाला कशाचाच ताळमेळ नाही  

तू कर मारल्यासारखं , 

मी करतो रडल्यासारखं 

उंदराला मांजर साक्ष ,

दोन्हीही शोधतात भक्ष 

 

आमचं आमंत्रण तुम्हाला गडे,

पोटभर जेवा कि उष्ट पाडा

आग्रहाचं आमंत्रण दुसर्यांनाही सांगा    

लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही  

ते वसवतात फक्त स्वप्नाचा गाव 

अन खाऊन जातात नाहक भाव 

अर्धाअधिक देश उपाशी झोपतो 

पोशिंदा बाप , फास गळी लावतो 

कुणी हिरावला आमचा तोंडचा घास 

भाबड्या बिचाऱ्यांना कळत नाही  

संपणार कधी सत्तेचा नंगानाच 

की कुत्रागत तो असाच बाली जाईल ?

जाऊ द्यां ना  राव आपल्याला काय करायचं 

आग त्याच्या घरात आपुन कशाला हळहळायचं ? 

आम्ही लिहतो , ओरडतो घसा फुटेस्तोवर बेंबीच्या देठापासून ...

मुर्दाड होऊन नामर्दासारखं तू फक्त वाच ... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy