Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neha Ranalkar

Abstract

3  

Neha Ranalkar

Abstract

तू नसल्यावर

तू नसल्यावर

1 min
147


अगदी एकटं नको नकोसं होई

माझ्यासवे तू नसल्यावर |

सारे कसं नवनवं, हवहवं

वाटतं संगतीला तू असल्यावर | |१| |


अंधारुन येते उजेड असतांना

विरहात निराशा दाटे मनी |

सखे आठवत तुला बसतो मी

प्रतिक्षा करत प्रत्येक क्षणी | |२| |


 रोजचं जगणं होतं कंटाळवाणं

असते जेव्हा मजपासून दूर |

सारे काही जवळ असतांना

मला वाटते तुझीच हूरहूर | |३| |


तू वेड मजला लावले तुझ्या

शिवाय वाटे अशक्य जगणं |

ये लवकर भेटाया मज प्रिये

बंद करी मजवरी असं रूसणं | | ४| |


प्रियकराने प्रेयसीच्या विरहात केलेली ही कविता. तिच्याशिवाय त्याला हे जग किती सूने सूने वाटते हे भाव अगदी मनापासून त्याने व्यक्त केले आहे.तिची प्रतिक्षा करणं त्याच्या सहनशक्तीच्या पलीकडे!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract