STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Romance

2  

Abasaheb Mhaske

Romance

तू नाही म्हटलंस तरी ...

तू नाही म्हटलंस तरी ...

1 min
14.4K


तू नाही म्हटलंस तरी

स्वप्नात येईल तुझ्या ...

काय ते समजून घे तुझं तू

पण भेटत राहीन तुला...

तू ही येतेसची कि स्वप्नात माझ्या

अन रात्रंदिनी छळतेस मजला ...

कसं सांगावं प्रेम आहे तुझ्यावर?

रात्रंदिनी प्रश्न तोच भेडसावतो ग मला

काहीही झालं तरी मी येणारंच...

येण्यास जाण्यास स्वप्नात तुझ्या

कुठे परवानगी लागते मला ?

तशीही तू कुठे नाही म्हणणार आहेस म्हणा

खात्री आहे मला जे वाटतय

तेच वाटत तुलाही पण ...

सांगण्यास थोडी कचरतेस

सामोरी जाताना थोडी गोंधळतेस

दिसली नाहीस तू सैरभैर होतो मी

मीही होतो नजरेआड तेव्हा...

तू ही शोधतेसच मला

नजरेस नजर भिडता लाजतेस पुन्हा

प्रेम हे असंच असत ग...हवंहवंसं

डोळेच तुझे बोलून जातात खूप काही ..

तू कशाला सांगायला हवं...

मी काय तुला आज ओळखतो?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance