STORYMIRROR

Prashant Tribhuwan

Inspirational

4  

Prashant Tribhuwan

Inspirational

तू माणूस झाला

तू माणूस झाला

1 min
165

असा कसा रे माणसा तू माणूस झाला

काळीमा फासला तू माणसाच्याच माणुसकीला l ध्रु l


रात्रंदिन नश्वर भोगामागे पळाला,

फास लावला तू प्रेम, माणुसकीचा गळ्याला l १l

असा कसा रे माणसा तू माणूस झाला l ध्रु l


क्षणिक सुखासाठी न थांबता जीवनभर पळाला,

आणि शेवटी सारे करूनही उद्वस्थ संसार मिळाला l २l

असा कसा रे माणसा तू माणूस झाला l ध्रु l


इतरांकडून मिळते तेव्हा घेताना होतो डोळे मिटून मनिमाऊ,

कधी तरी विचार कर रे आपणही समाजाला काही तरी देऊ l ३l

असा कसा रे माणसा तू माणूस झाला l ध् l


स्वर्थांधापोटी तू मांडला तुझ्याच जीवनाचा खेळ,

आता होता होईना सगेसोऱ्यांशी (मित्र , समाज) मेळ l ४l

असा कसा रे माणसा तू माणूस झाला l ध्रु l


सारे तारुण्य घातले येनकेन प्रकारे मिळवण्यासाठी वित्त,

आणि वृध्दकाळ घालतो सत्संगात मिळवण्यासाठी चित्त l ५l

असा कसा रे माणसा तू माणूस झालाl ध्रु l


साऱ्या नात्यात तू नेहमीच पहिला स्वार्थ,

आणि यातच तू घातले सारे जीवन व्यर्थ l ६l

असा कसा रे माणसा तू माणूस झाला l ध्रु l


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational