*तू ज्ञानाची ग ज्योत आई*
*तू ज्ञानाची ग ज्योत आई*
तू ज्ञानाची ग ज्योत आई
ज्ञानाची तुझी प्रीत
लढली पूर्ण समाजाशी
बघून स्त्री जातीचे हित
तू आहे आमची माता
नाही तुझ्या सारखं कुणी
दगड शेन घेऊन अंगावर
ज्ञानाची ज्योत तुझ्या मनी
लढली मारकर्यांशी तू
ऐकले लोकांचे कटू शब्द
बघून तुझे काम आज
लोकही आहे स्तब्ध
होता कधी विरोध तुझा
दिला तू त्यांना नकार
सार्थक बनविले स्त्री शिक्षणाला
देऊन आपल्या शब्दांना होकार.
मी आहे तुझीच लेक आई
तू मिटवला लोकांचा विकार
ज्ञानाची ज्योत लावून
कर माझ्या नमनला स्वीकार.
