STORYMIRROR

Milind Ghaywat

Inspirational

3  

Milind Ghaywat

Inspirational

तू हुरळून जाऊ नकोस

तू हुरळून जाऊ नकोस

1 min
1.9K


आज तुझे खूप गोडवे गाणार

सगळीकडे तुझा उदोउदो करणार..

सगळीकडे तू कशी ग्रेट आहेस,

ह्यावर जो तो भाषण देत बसणार..


वाटेल तुला ही आज,

आपण किती श्रेष्ठ आहोत

आहेसच तू श्रेष्ठ, तिळमात्र नाही शंका

पण तुझ्या मोठेपणाचा वाजवू नकोस डंका


तू हुरळून नको जाऊस

ह्या एक दिवसाच्या सोहळ्याने

तू हे ही विसरून नकोस,

हे मिळालंय मोठ्या संघर्षाने.


नेहमीच लक्षात ठेव की

ही लांडग्याची जमात आहे..

आज उदोउदो करतील

आणि उद्या तुला किती ग भाव देतील?

आज तुझी पूजा करणारे

उद्या तुझ्याकडे एक भोगी म्हणून पाहतील..


हा आहे भोंगीपणा,

हा आहे दांभिकपणा

वर्षानुवर्षे चालत आलेला...

तुला नेहमीच बंधनात ठेवून

लक्ष्मणरेषेचे नाव दिलेला..


तुला नेहमीच ग भिंतीत कोंडलं,

तुझ्या स्वप्नांना चूल आणि मूलच्या कोंदणात गोंदलं.

तू मात्र त्या ही बेड्या तोडून बाहेर पडलीस

त्या क्षितीजाच्या ही मर्यादा ओलांडून आकाशाच्याही पलीकडे गेलीस


हे काय ह्यांना सहन होणार नव्हतं आणि होणार ही नाही

तुला मोठेपणा देण्यात ह्यांना कमीपणा वाटतो

तुझ्या पुढे पुढे करण्यात ह्यांच्या पुरुषत्वाचा अपमान होतो

मग तू कितीही पुढे गेलीस तरी तुला नाचायला लागत ह्यांच्याच इशाऱ्यावर,

तू कितीही यशस्वी झाली तरी तुला सहन करावे लागतात तुझ्यावर रोज होणारे बलात्कार..

कधी शरीरावर, कधी मनावर तर कधी विचारांवर...

कारण तू ह्यांच्यासाठी केवळ एक भोगवस्तू आहेस,

केवळ एक भोगवस्तू..

ह्याच्यातील पिशाच्च जागा झाला की हा विसरून जाती सारी नाती..

मग राहतेस तू फ़क़्त ह्यांची गरज भागवणारी मादी.


म्हणूनच म्हणतोय कितीही गातील आज तुझे गुणगान,

करतील तुझे मोठमोठाले सत्कार सोहळे,

पण तू मात्र हुरळून जाऊ नकोस

तू मात्र हुरळून जाऊ नकोस....



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational