STORYMIRROR

Milind Ghaywat

Others

3  

Milind Ghaywat

Others

स्वप्नांचा वसंत

स्वप्नांचा वसंत

1 min
1.0K


ही पानगळ

लवकरच थांबणार आहे!!

मरगळलेल्या झाडांना

नव्याने पालवी फुटणार आहे!!!


त्या प्रपाती वादळातही

जराही नाही डगमगलास..

जपून साऱ्यांचं अस्तित्व

खंबीरपणे उभा राहिलास...


मग ह्या पानगळीत तू

असा का कुढतो आहेस?

असाह्यतेच्या वेदनेने

का वेड्यासारखं खचतो आहेस


तू का विसरतोस की,

हे ही दिवस जातील

भीषण काळोखाला चिरून

पुन्हा सोनेरी किरणे येतील!!


भयंकर आशेचा सूर्य..

पुन्हा उगवणारच आहे

तुझ्या माझ्या स्वप्नांचा वसंत

पुन्हा एकदा बहरणार आहे

तुझ्या माझ्या स्वप्नांचा वसंत

पुन्हा एकदा बहरणार आहे!!!


Rate this content
Log in