STORYMIRROR

Milind Ghaywat

Others

3  

Milind Ghaywat

Others

मन पाखरू पाखरू

मन पाखरू पाखरू

1 min
1.7K


मन पाखरू पाखरू

तुझ्या मागं भिरंभिरं

जरी असली तू दूर

सदा तुझी हुरहूर…


मन पाखरू पाखरू

फिरतया सैरभरं

असा कसा हा दुरावा

अनं कसल हे वैरं


मन पाखरू पाखरू

जीव व्हई येडापिसा

आस वाहते डोळ्यात

कधी येशील राजसा


मन पाखरू पाखरू

जीव झाला कासावीस

समजावू त्याला कसं

वाटे जग हे भकास


मन पाखरू पाखरू

सोसे विरह वेदना

चरे पाडतात उरी

मिलनाच्या खाणाखूणा.



Rate this content
Log in