STORYMIRROR

Milind Ghaywat

Tragedy

4.9  

Milind Ghaywat

Tragedy

श्रद्धांजली वाहायची म्हणतोय...

श्रद्धांजली वाहायची म्हणतोय...

1 min
2.2K


श्रद्धांजली वाहायची म्हणतोय...


श्रद्धांजली वाहायची म्हणतोय....

पण कळत नाही कोणाला आणि कशी???

त्याच त्याच घासून गुळगुळीत झालेल्या कोरड्या शब्दांनी

कि डोळ्यांतच सुकणाऱ्या अश्रूंनी???

आणि नक्की कोणाला श्रद्धांजली वाहायची हो.....

आणि नेमकं कोणाचं सांत्वन करायच??


दर दिवसाआड हरहुन्नरी जीव

नाहकच गमावला जातोय..

उम्मेदीत घरातला कर्ताधर्ता आधार

अर्ध्यात वाऱ्यावर सोडून जातोय..

नक्की कोणांच सांत्वन करणार?

नक्की श्रद्धांजली कोणाला वाहणार??


कोणीतरी नुकतंच प्रेमात पडलंय,

कोणी मागच्या भेटीत लग्न ठरवून आलंय,

गावाकडे लग्नाची जोरदार तयारी सुरु झालीय,

सुट्टी मिळाली की धुमधडाक्यात

बार उडवायचचं राहिलंय..

तर कोणी नुकत्याच जन्माला पिल्याला

बघायला जाण्यासाठी सुट्टी मागतंय..

नक्की कोणांच सांत्वन करणार?

नक्की श्रद्धांजली कोणाला वाहणार??


अमाप कौतुक आईला..

पोरगं देशसेवा करतंय म्हणून...

चारचौघात मान उंचावून सांगत असली तरी

लेकरू सुखरूप असलं नां???

ह्या काळजीने उडणारा थरकाप

न बोलता खूप काही सांगून जातो...

बाप जरी देत असला कितीही मिशीला पीळ..

तरी युद्धाच्या, हल्ल्याच्या बातम्या ऐकून

तडफडत असतो रोज रात्र रात्रभर

पुसून टाकतो अंधारातच

डोळ्यांतले अश्रू डोळ्यांतच..

थकलेल्या बायकोला धीर देण्यासाठी...

नक्की कोणांच सांत्वन करणार?

नक्की श्रद्धांजली कोणाला वाहणार??


श्रद्धांजली वाहूयात

ह्या लुच्यापुच्या नेत्यांना

मिठू मिठू करणाऱ्या

बोलक्या पोपटांना..

बाबांनो, कुठे गेली तुमची

छप्पन इंचाची छाती?

म्हटलेलं 'चुन चुन के मारेंगे',

का नाही वाटली ह्याची कधी भीती???


श्रद्धांजली वाहूयात गुप्तचर यंत्रणेला

ती नेहमीच निकामीच ठरली..

सैनिकांच्या प्राणांची किंमत

खरंच तुम्हा अजूनही नाही कळली?


त्यांनाही श्रद्धांजली वाहूयात

ज्यांची देशभक्ती सोशल मीडियावर असते

जरा काही विरोधात बोललं

की लगेच देशद्रोहीचं लेबल दिसते..


पुरी झाली भाषणे मित्रा

पुरी झाली भक्ती...

बंद कर तुझे परदेश दौरे

दाखव जरा तुझी शक्ती


जास्त न बोलता शत्रूंना आता

औकात दाखवायला हवी

नाहीतर मग आता तुलाही

श्रद्धांजली वाहायला हवी..


षंढासारख्या बसलेल्या सर्वांनाच आता

श्रद्धांजली वाहायला हवी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy