Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Milind Ghaywat

Inspirational

5.0  

Milind Ghaywat

Inspirational

हे शुभम.....

हे शुभम.....

1 min
410


हे शुभम


मित्रा, तू काही सलमान नाहीस रे

की तुझे बलिदान आज हेडलाईनला असेल,

लाजेकाजेस्तव येईलही मीडियात बातमी

एखाद्या कोपऱ्यात....

शक्य तितक्या शॉर्टकट मध्ये...


सलमानबद्दल मात्र सगळं सविस्तर

कैदी नंबर, बराक नंबर पासून

रात्री काय आणि किती जेवला

कधी झोपला नि कसा झोपला

सकाळी उठुन त्याने काय काय केलं

हे मात्र दाखवत राहतील दिवसभर....


त्याच्यापुढे नाही दिसणार एका आईचे दुःख,

विसाव्या वर्षी धारातीर्थी पडलाय जिचा सुपुत्र,

कसं सांभाळलं असेल तिने आज स्वतःला

कसं पाहिलं असेल तिने लेकाला राख होताना


सामान्यांच्या भावना काही

एनकॅश करता येत नाहीत

म्हणून हे दाखवतील

आपल्या सेलिब्रेटी भावासाठी रडलेल्या बहिणी..

खऱ्या हिरोपेक्षा पडद्यावरच्या हिरोसाठी

त्याचा चाहत्यांनी गाळलेले आसू


एका तद्दन व्यावसायिक अभिनेत्यामुळे

होणारे नुकसानही हे मोजत बसतील,

तुझ्या कुटुंबाची कधीही न भरून येणारी हाणी

मात्र ह्यांच्या खिजगणतीतही नसेल...



तू सलमान नाहीस म्हणून

तुझा विषय संपून जाईल आजच त्यांच्यासाठी,

मात्र सलमान बद्दल रकानेच्या रकाने भरतील

अजून महिनाभर तरी...


त्याच्या सामाजिक प्रेमापुढे

तुझं देशप्रेम पार फिक्क करून टाकतील हे..

त्याने किती लाखाची मदत केली

आणी किती करोड दान दिले

हे मात्र ठासवतील प्रत्येकाच्या मनामनात...


त्याने माणसं उडवली,

त्याने काळवीट मारली,

त्याने पैश्याच्या जोरावर न्यायालय ही चालवली

तरी मिडियासाठी मात्र तोच हिरो असेल

त्यांच्या हिरोगिरीपुढे तुझ्या कर्तृत्वाचं

आणि तुझ्या बलिदानाचं योगदान मात्र झिरो असेल.

तुझ्या बलिदानाचं योगदान मात्र झिरो असेल..


Rate this content
Log in