STORYMIRROR

Milind Ghaywat

Inspirational

5.0  

Milind Ghaywat

Inspirational

मनाचा भास

मनाचा भास

1 min
551



सुर्यासोबत सुरू झालेला दिवस

सुर्यासोबतच मावळून जातो

विकसित भारत, शायनिंग इंडिया

शब्द मी मनाशी खेळत राहतो...


सत्तर वर्षे झाली स्वातंत्र्य मिळून

अजून विकासाचा नाही वारा

तिकडे येणार आता बुलेट गाडी

आमचा सगळाच फाफट पसारा...


ह्याचं सरकार आलं,

त्याचंही सरकार आलं

शहरे झाली हायफाय

गाव मात्र जागच्या जागीच राहिलं...


पाण्यासाठी ही जावं लागतं

कोसो कोसो दूर

गॅस बिस फक्त नावालाच

घरा घरात दाटतो धूर...


हजारो योजना येतात,

करोडो खर्चही होतात

गावाच्या वाट्याला मात्र

नेहमीच दगडगोटे राहतात


दारिद्र्य आमच्या पाचवीला

नाही कसलीच काही आस

इंडिया आणि भारत एकच ना

की हा फक्त मनाचा भास


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational