STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Inspirational

2  

Abasaheb Mhaske

Inspirational

तू असावे माझ्यासारखे

तू असावे माझ्यासारखे

1 min
14.5K


तू असावे माझ्यासारखे अन मी असावे तुझ्यासारखे

तिथे नसावे शह अन काटशह कधीच नसावे धूर्त कावे

नसो मनी संशयाचं भूत मानगुटावर कधी नसावे हेवेदावे 

विसरून सारे जात धर्म आणि केवळ मानवतेचे गीत गावे

तू मला आणि मी तुला फक्त एकदा समजून घ्यावे

जात्यंध आणि दुराभिमानि कुणी नसावे

नकोच इथे घरभेदी आणि माणूसघाणे

तू हि चुकलास तसा मी चुकलो सर्व माफ

कोण चुकला कसा चुकला? कुठवर गाणार हे रडगाणे?

मानवतेचे गीत गाण्या सूर जुळावे परस्परांचे

तू माझे डोळे अन मी तुझे हात व्हावे

असेल तोवर सप्तसुरांची मैफिल सजवू 

कळले आम्हा दोन घडीचा डाव आपुला

वृथा अभिमानही का असावा जाते समयी गडे 

गाऊया चला मानवतेचे जीवनगाणे जिकडे तिकडे चोहीकडे 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational