STORYMIRROR

Sant Tukaram

Classics

2  

Sant Tukaram

Classics

तुम्ही संत मायबाप

तुम्ही संत मायबाप

1 min
17.5K


तुम्ही संत मायबाप कृपावंत ।

काय मी पतित कीर्ति वानू ॥१॥


अवतार तुम्हा धराया कारणे ।

उद्धराया जन जड जीव ॥२॥


वाढावया सुख भक्ति-भाव धर्म ।

कुळाचार नाम विठोबांचे ॥३॥


तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी ।

तैसे तुम्ही जगी संतजन ॥४॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics